महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित

MAHARASHTRA STATE OBC FINANCE & DEVELOPMENT CORPORATION LTD

उपकंपनी
शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ ( कार्यक्षेत्र - कोकण विभाग )
जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ ( कार्यक्षेत्र - सर्व जिल्हे )
संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ ( कार्यक्षेत्र - सर्व जिल्हे )
इतर मागास बहुजन कल्याण विभाग
( महाराष्ट्र शासनाचा उपक्रम )
  2527 5374 | 2529 9685
  ईमेल पाहण्यासाठी क्लिक करा
   
   

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित

MAHARASHTRA   STATE   OBC   FINANCE   &   DEVELOPMENT   CORPORATION   LTD



चालू घडामोडी

जून - 2026, स्वयंरोजगार मेळावा तपशील

जिल्हा - भंडारा
दिनांक 25/06/2026 रोजी तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा येथे आयोजित महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारा आयोजित मेळाव्यात बाह्य सेवा कर्मचारी चंद्रशेखर मेश्राम यांनी उपस्थितांना महामंडळाच्या योजनांची माहिती दिली.



एप्रिल - 2026, स्वयंरोजगार मेळावा तपशील

जिल्हा - नांदेड
दि.30.04.2026 रोजी श्री.शंकरराव सभागृह, विष्णूनगर, नांदेड येथे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत समाविष्ट महामंडळे, महाज्योती, वनार्टी या संस्थांचा सदर कार्यक्रमात सहभाग होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विभागाचे मा.मंत्री नामदार श्री. अतुलजी सावे यांनी भुषविले. ओबीसी आणि बहुजन समाज्याच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी शासन कटिबध्द असून ओबीसीचा सर्वसमावेशक विकास करण्यावर शासनाचा भर असल्याचे प्रतिपादन मा.मंत्री महोदयानी आपल्या मार्गदशनपर भाषणादरम्यान केले. सदर कार्यक्रमास विद्यमान खासदार श्री.अशोक चव्हाण, खासदार डॉ.अजित गोपछडे, आमदार श्री.राजेश पवार, आमदार श्री.बाबूराव कोहळीकर, महापौर श्रीम.कविता मुळे, आदी मान्यवर उपस्थित होते. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीम.मेघना कावली, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाच्या संचालक श्रीम.सोनाली मुळे, ओबीसी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. वसंत माने तसेच वसंतराव नाईक महामंडळाचे व महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक आणि वनार्टीचे संचालक सदर कार्यक्रमास उपस्थित होते. त्याचप्रमाणे ओबीसी महामंडळाचे सर्व वरिष्ठ अधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते. सदर कार्यक्रमात लाभार्थ्यांनी ऑनलाईन योजनांचे अर्ज कसे भरावेत याबाबतची माहिती पुस्तिका, वनार्टीच्या माहिती पुस्तिका तसेच महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळाच्या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील तरुण-तरुणी, विविध योजनांचे लाभार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



जिल्हा - कोल्हापूर
मा.ना. माधुरीताई मिसाळ, राज्यमंत्री - नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकिय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ महाराष्ट्र राज्य तथा सह-पालकमंत्री, कोल्हापूर यांचा दि.24 एप्रिल, 2026 रोजीच्या कोल्हापूर जिल्हा भेटी दरम्यान ओ.बी.सी महामंडळा तर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व महामंडळच्या योजनांची माहिती देण्यात आली.


जिल्हा - नागपूर
भारतीय जनता पार्टी, दक्षिण - पश्चिम मतदार संघ, नागपूर यांचे वतीने दिनांक 09/04/2026 रोजी आयोजित कार्यक्रमामध्ये महामंडळाच्या योजनांची उपस्थितांना माहिती देण्यात आली.


जिल्हा - सांगली
सहाय्यक आयुक्त, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समाज कल्याण विभाग, सांगली यांचेद्वारा दि.07/04/2026 ते दि.14/04/2026 दरम्यान सामाजिक समता सप्ताहा निमित्ताने आयोजित कौशल्य उद्योजक्ता प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यशाळा कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना जिल्हा कार्यालय, सांगली यांचेद्वारा महामंडळाच्या योजनांची माहिती देण्‍यात आली.



मार्च - 2026, स्वयंरोजगार मेळावा तपशील

ज़िल्हा – बीड
जिल्हा कौशल विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बीड व तुळशी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 17.03.2026 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त जिल्ह्यातील महिला व युवतींसाठी. पंडित दीनदयाळ उपाध्याय महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. तुलसी कॉलेज फॅशन डिझायनर, बीड या कॉलेजच्या प्राचार्या श्रीमाती. अश्विनी बेंद्रे तसेच तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय, बीड या कॉलेजचे प्राचार्य श्री.देविदास निकाळजे यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सदर कार्यक्रमास मा. विवेक जॉन्सन ( भा.प्र. से.) जिल्हाधिकारी, बीड., मा. श्रीमती. पुजा पवार पोलीस उप अधिक्षक बीड, मा. रेश्मा चिमंद्रे बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) बीड, मा. श्रीमती पल्लवी जाधव पोलीस उपनिरीक्षक बीड, श्री. समाधान किरवले,सहाय्यक आयुक्त बीड आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमा दरम्यान महामंडळाच्या बीड जिल्हा कार्यालयाद्वारा स्टॉल लावण्यात आला होता. जिल्हा कार्यालयातील बाह्यसेवा कर्मचारी श्री.सूरज शेंडगे यांनी उपस्थितीतांना महामंडळाच्या योजनांची माहिती दिली.


ज़िल्हा – छत्रपती संभाजीनगर
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दिनांक 05/03/2026 रोजी देवगिरी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र स्टेशन रोड येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. सदर मेळाव्या दरम्यान महामंडळाचा स्टॉल लावण्यात आला होता. सदर प्रसंगी जिल्हा कार्यालयाचे बाह्य सेवा कर्मचारी श्री.प्रसाद खोडके यांचेद्वारा उपस्थितांना महामंडळाच्या योजनांची माहिती देण्यात आली व माहिती पत्रके वितरीत करण्यात आली.


ज़िल्हा – नागपूर
जागतिक महिला दिन दि.08.03.2026 रोजी विश्वकर्मा सुतार प्रबोधन विकास मंडळ नागपूर द्वारा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. सदर प्रसंगी श्री संत भोजलिंग काका सुतार समाज आर्थिक विकास मंडळाच्या सर्व योजनाची माहिती देण्यात आली.


ज़िल्हा – नागपूर
दिनांक 22/03/2026 रोजी कन्हान, नागपूर येथे 'कौशल्य विकास, प्रशिक्षण, स्वयंरोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन' शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कन्हान तसेच आजुबाजूच्या परिसरातील सुमारे 600 पेक्षा जास्त महिला, युवक आणि नागरिकांनी या मार्गदर्शन शिबिराचा लाभ घेतला आहे. शिबिरा दरम्यान महामंडळाचा स्टॉल लावून जिल्हा कार्यालयाचे बाहयसेवा कर्मचारी श्री. अमोल कोंडे व श्री.उल्हास देशमुख यांनी उपस्थितांना महामंडळाच्या योजनांची माहिती दिली व योजनांची माहिती पत्रके वितरीत केली.


ज़िल्हा - रत्नागिरी
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी यांचेद्वारा दिनांक 15 मार्च 2026 रोजी महामेळावा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास मा.पालक न्यायमूर्ती श्री जामदार साहेब व अन्य मान्यवर उपस्थित होते. शिबिरादरम्यान उपस्थितांना महामंडळाच्या योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली


ज़िल्हा – सोलापूर
दि पंढरपूर मर्चंट को-ऑप बँक लि., पंढरपूर यांचेद्वारा दिनांक 14 मार्च 2026 रोजी युवा उद्योजक मेळावा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमादरम्यान जिल्हा कार्यालय, सोलापूर यांचेद्वारा उपस्थितांना महामंडळाच्या योजनांची माहिती देण्यात आली.


फेब्रुवारी - 2026, स्वयंरोजगार मेळावा तपशील

जिल्हा - छ. संभाजीनगर
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दिनांक 11/02/2026 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे रोजगार मेळावा संपन्न झाला. सदर मेळाव्या दरम्यान महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे स्टॉल लावून उपस्थित लाभार्थींना योजनांची माहिती व माहितीपुस्तिका वितरीत करण्यात आल्या. महामंडळाच्या जिल्हा कार्यालयातील लेखापाल श्रीमती अश्विनी पंडुरे मॅडम तसेच, बाह्यसेवा कर्मचारी श्रीमती प्रियंका पडघन सदर मेळाव्याकरीता उपस्थित होत्या.

जिल्हा - धुळे
1) जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र, 2) धुळे मॉडेल करिअर सेंटर, 3) जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, 4) जिल्हा परिषद धुळे तसेच 5) युथ फॉर जॉब, देवपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग उमेदवारांसाठी दिनांक 04 फेब्रुवारी 2026 रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. सदर प्रसंगी जिल्हा कार्यालयाचे बाह्य सेवा कर्मचारी श्री पुनीत पवार यांचेद्वारा उपस्थितांना महामंडळाच्या योजनांची माहिती देण्यात आली.


जिल्हा - धुळे
जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण, धुळे व जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी अनुसूचित जाती आणि नव बौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा सोनगीर, तालुका जिल्हा धुळे येथे शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. सदर प्रसंगी जिल्हा कार्यालयाचे बाह्य सेवा कर्मचारी श्री सागर पाटील व श्री पुनित पवार यांचेद्वारा उपस्थितांना महामंडळाच्या योजनांची माहिती देण्यात आली.

जिल्हा - हिंगोली
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यांचे संयुक्त विद्यमाने दि - 13 फेब्रुवारी 2026 रोजी श्री नानाजी देशमुख शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जिल्हा हिंगोली येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. सदर मेळाव्या दरम्यान महामंडळाचा स्टॉल लावण्यात आला होता. सदर प्रसंगी जिल्हा कार्यालयाचे बाह्य सेवा कर्मचारी श्री रवि पोटे यांचेद्वारा उपस्थितांना महामंडळाच्या योजनांची माहिती देण्यात आली व माहिती पत्रके वितरीत करण्यात आली.

जिल्हा - सोलापूर
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर व जिल्हा प्रशासन, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 28/02/2026 रोजी वडाळा, उत्तर सोलापूर येथे विधी सेवा शासकीय योजना महाशिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी श्री. मनोज शर्मा - प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, सोलापूर तथा अध्यक्ष तसेच मा. न्यायमूर्ती श्री. निजामोद्दीन जमादार - न्यायमूर्ती उच्च न्यायालय, मुंबई, श्री. फिरदोश पूनिवाला - न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई, श्री. एम. राजकुमार (भा. पो. से.), पोलीस आयुक्त - सोलापूर शहर, श्री. गणेश निऱ्हाळी - अप्पर जिल्हाधिकारी सोलापूर, श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक - सोलापूर आदि मान्यवर उपस्थित होते. त्याचप्रमाणे, इ.मा.ब.क विभागाचे व अन्य शासकीय महामंडळातील अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते. सदर मेळाव्यादरम्यान उपस्थितांना महामंडळाच्या योजनांची माहिती देण्यात आली.

जिल्हा - वर्धा
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वर्धा आणि हरदयाल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पुलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 07/02/2026 रोजी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. सदर मेळाव्यात वर्धा जिल्हा कार्यालयाचे बाह्य सेवा कर्मचारी श्री. अक्षय भगत यांनी उपस्थितांना महामंडळाच्या योजनांची माहिती दिली आणि जास्तीत जास्त व्यक्तींनी महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.


जानेवारी - 2026, स्वयंरोजगार मेळावा तपशील

जिल्हा - बीड
कौशल्य विकास व उद्योजकता रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बीड व स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय उद्योजक मेळावा दिनांक 12/01/2026 रोजी संपन्न झाला. सदर मेळाव्यात बाह्यसेवा कर्मचारी श्री.शेंडगे यांनी ओबीसी महामंडळ राबवित असलेल्या योजनांची माहिती दिली व येणाऱ्या अभ्यागतांना ओबीसी महामंडळाची माहिती पत्रके वितरीत केली. सदर मेळाव्यास संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. नंदकिशोरजी मुंदडा हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. त्याचप्रमाणे, सदर कार्यक्रमास मा. श्री विलास तरंगे - तहसीलदार अंबाजोगाई, मा.श्रीमती. विद्या शितोळे मॅडम - कौशल्य विकास व उद्योजकता विभागीय आयुक्त, मा. श्री. समाधान किरवले - कौशल्य विकास आयुक्त, बीड तसेच स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय, अंबाजोगाईचे प्राचार्य श्री.प्रशांत देशमुख सर आणि योगेश्वरी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. एन व्ही कानेटकर सर आदी मान्यवर उपस्थितीत होते.


जिल्हा - भंडारा
दिनांक 11/01/2026 रोजी समर्थ ग्राउंड (लाखनी) ता.लाखनी येथे विधी सेवा व शासकीय योजनांचे महाशिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर मेळाव्यात बाह्यसेवा कर्मचारी श्री. तुषार रेहपाडे आणि श्री.चंद्रशेखर मेश्राम यांनी उपस्थित राहून महामंडळाच्या योजनांची माहिती दिली.


जिल्हा - भंडारा
कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत पाचगांव, भंडारा येथे दिनांक 19/01/2026 रोजी आयोजित कार्यक्रमात महामंडळाचे बाह्यसेवा कर्मचारी श्री चंद्रशेखर मेश्राम यांनी उपस्थितांना महामंडळाच्या योजनांची माहिती दिली.


जिल्हा - हिंगोली
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यांचे संयुक्त विद्यमाने श्री योगाणंद स्वामी कला महाविद्यालय वसमत तालुका – वसमत, जिल्हा – हिंगोली, येथे दि - 22 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10:00 वाजता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा – 2026 संपन्न झाला. सदर मेळाव्यात महामंडळाच्या स्टॉल लावून बाह्यसेवा कर्मचारी श्री. रवि पोटे यांनी उपस्थितांना महामंडळाच्या योजनांची माहिती दिली व माहिती पत्रके वितरीत केली.

जिल्हा - हिंगोली
जिल्हा - हिंगोली
जिल्हा - हिंगोली

जिल्हा - जालना
दिनांक 26/01/2026 या प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे आयोजित कृषी यांत्रिकीकरण वितरण कार्यक्रम प्रसंगी मा. पालकमंत्री महोदया श्रीम.पंकजा गोपीनाथ मुंडे यांच्या शुभ हस्ते ओबीसी महामंडळाच्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेचे लाभार्थी श्री.परवेज नजीर खान पठाण यांना अशोक लेलँड साथी या वाहनाचे वाटप करण्यात आले. सदर मेळाव्यास श्रीम.अस्मिता मित्तल मॅडम – मा. जिल्हाधिकारी, जालना, श्री.गणेश चिमणकर - मा. सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजक्ता मार्ग दर्शन केंद्र, जालना तसेच, मा. आमदार अर्जुन खोतकर साहेब (जालना), मा. आमदार बबनराव लोणीकर साहेब (परतूर), आणि मा. आमदार नारायण कुचे (बदनापूर मतदार संघ) आदी मान्यवर उपस्थित होते. सदर मेळाव्यात महामंडळाचे वसुली निरिक्षक, श्री. सोहेल शेख व बाह्यसेवा कर्मचारी श्री.अभिषेक राजूरकर यांनी उपस्थितांना महामंडळाच्या योजनांची माहिती दिली.


जिल्हा - नांदेड
विराट प्रभू श्री विश्वकर्मा प्रगट दिनानिमित्त कामठा खु. ता.जि. नांदेड येथे दि.31.01.2026 रोजी आयोजित कार्यक्रमात सुतार प्रवर्गातील उपस्थितांस नव्याने स्थापन झालेल्या संत भोजलिंग काका सुतार समाज आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांची माहिती देण्यात आली. सदर कार्यक्रमास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक श्री.एस.एन.झुंजारे तसेच श्री. मिनगिरे सर, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण उपस्थित होते.


जिल्हा - ठाणे
ग्रामविकास अधिकारी ता. मुरबाड व ग्राम पंचायत भोरांडे येथील सर्व सदस्य तसेच श्री.वैभव सिताराम सरोगदे, सरपंच यांच्या सयुंक्त विद्यमाने दिनांक 21/01/2026 रोजी मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान कार्यक्रम व महिला सक्षमीकरण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात महामंडळाचे बाह्यसेवा कर्मचारी श्री. मयेश खंडू शिंदे यांनी उपस्थितांना महामंडळाच्या योजनांची माहिती दिली व माहिती पत्रके वितरीत केली.


नोव्हेंबर - 2025, स्वयंरोजगार मेळावा तपशील

जिल्हा - धाराशिव (नोव्हेंबर 2025)
लोकमंगल को ऑप बँक लि. सोलापूर व लोकमंगल मल्टिस्टेट को ऑप सोसायटी लि. यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 04/11/2025 रोजी श्री. तुळजाभवानी पुजारी मंगल कार्यालय S. T. बसस्टॅण्ड जवळ तुळजापूर येथे कर्ज विषयक मार्गदर्शन शिबीर व उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर मेळाव्यात महामंडळाचे बाह्यसेवा कर्मचारी श्री. मधुकर शिनगारे यांनी उपस्थित राहून महामंडळ राबवित असलेल्या योजनांची माहिती दिली.


जिल्हा - ठाणे (01/11/2025)
जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे व संत सावता माळी मंडळ, ऐरोली व सृजन संवेदना फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 1 नोव्हेंबर, 2025 रोजी संत सावतामाळी भवन, सेक्टर-5, ऐरोली, नवी मुंबई येथे स्वयंरोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. सदर प्रसंगी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाचे माजी व्यवस्थापकीय संचालक श्री. आनंद माळी साहेब यांनी महामंडळाच्या स्टॉलला भेट दिली. सदर मेळाव्यामध्ये बाह्य सेवा कर्मचारी श्री.मयेश शिंदे यांनी उपस्थितांना महामंडळ राबवित असलेल्या सर्व योजनांची माहिती दिली तसेच माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले.


महाराष्ट्र राज्य ओबीसी महामंडळ, वसंतराव नाईक वि.जा.भ.ज. महामंडळ तसेच महात्मा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.01.11.2025 रोजी सकाळी 10:00 वाजता तिरूमला मंगल कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास मा.ना.श्री.अतुल मोरेश्वर सावे, इतर मागास बहुजन कल्याण, महाराष्ट्र राज्य हे अध्यक्ष म्हणुन उपस्थित होते. मान्यवर लोकप्रतिनीधी, महाज्योती तसेच दोन्ही महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व अधिकारी सदर कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान अर्जदाराना महामंडळाच्या योजनांतर्गत Letter of Intent (LOI) तसेच मंजूरी पत्राचे वितरण करण्यात आले.


ऑक्टोबर - 2025, स्वयंरोजगार मेळावा तपशील

जिल्हा कार्यालय - भंडारा (07/10/2025)
श्री. चंद्रशेखर मेश्राम, बाह्यसेवा कर्मचारी - जिल्हा कार्यालय भंडारा यांनी दि.07.10.2025 रोजी महिला आर्थिक विकास महामंडळ यांचे CMRC सेंटर वरठी, भंडारा येथे उपस्थित महिलांना महामंडळाच्या योजनांची माहिती दिली.


जिल्हा कार्यालय - धाराशिव (14/10/2025)
महामंडळाचे बाह्यसेवा कर्मचारी श्री. मधुकर शिनगारे, जिल्हा कार्यालय – धाराशिव यांनी दि. 14/10/2025 रोजी पंचायत समिती, भूम येथे आयोजित केलेल्या स्वयंरोजगार मेळाव्यात उपस्थित राहून उपस्थितांना महामंडळ राबवित असलेल्या योजनाची माहिती दिली.

जिल्हा कार्यालय - धाराशिव
जिल्हा कार्यालय - धाराशिव
जिल्हा कार्यालय - धाराशिव
जिल्हा कार्यालय - धाराशिव

जिल्हा कार्यालय - धाराशिव (15/10/2025)
महामंडळाचे बाह्यसेवा कर्मचारी श्री. मधुकर शिनगारे, जिल्हा कार्यालय – धाराशिव यांनी दि. 15/10/2025 रोजी तहसील कार्यालय, परांडा येथे स्वयंरोजगार मेळाव्यास उपस्थित राहून उपस्थितांना महामंडळ राबवित असलेल्या योजनांची माहिती दिली.

जिल्हा कार्यालय - धाराशिव
जिल्हा कार्यालय - धाराशिव
जिल्हा कार्यालय - धाराशिव

जिल्हा कार्यालय - धाराशिव (16/10/2025)
महामंडळाचे बाह्यसेवा कर्मचारी श्री. मधुकर शिनगारे, जिल्हा कार्यालय – धाराशिव यांनी दि. 16/10/2025 रोजी तहसील कार्यालय, वाशी येथे स्वयंरोजगार मेळाव्यास उपस्थित राहून उपस्थितांना महामंडळ राबवित असलेल्या योजनांची माहिती दिली.

जिल्हा कार्यालय - धाराशिव
जिल्हा कार्यालय - धाराशिव
जिल्हा कार्यालय - धाराशिव

जिल्हा कार्यालय - धाराशिव (28/10/2025)
महामंडळाचे बाह्यसेवा कर्मचारी श्री. मधुकर शिनगारे, जिल्हा कार्यालय – धाराशिव यांनी दि. 28/10/2025 रोजी पुष्पक हॉल, धाराशिव येथे स्वयंरोजगार मेळाव्यास उपस्थित राहून उपस्थितांना महामंडळ राबवित असलेल्या योजनांची माहिती दिली.

जिल्हा कार्यालय - धाराशिव
जिल्हा कार्यालय - धाराशिव
जिल्हा कार्यालय - धाराशिव
जिल्हा कार्यालय - धाराशिव

जिल्हा कार्यालय - गोंदिया (06/10/2025)
श्री.सनी रजक, बाह्यसेवा कर्मचारी - जिल्हा कार्यालय, गोंदिया यांनी दि.06.10.2025 रोजी स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान (RSETI), गोंदिया येथे उपस्थितीताना महामंडळाच्या योजनांची माहिती दिली.

जिल्हा कार्यालय - गोंदिया
जिल्हा कार्यालय - गोंदिया

जिल्हा कार्यालय - गोंदिया (09/10/2025)
श्रीम. विशाखा फडणवीस, जिल्हा व्यवस्थापक – भंडारा यांनी दि.09.10.2025 रोजी महाराष्ट्र नाभिक महामंडळ, जिल्हा - गोंदिया व भंडारा यांनी संयुक्तरित्या आयोजित केलेल्या मेळाव्यास उपस्थित राहुन महामंडळाच्या योजनांबाबत मार्गदर्शन केले.

जिल्हा कार्यालय - गोंदिया
जिल्हा कार्यालय - गोंदिया

जिल्हा कार्यालय - नागपूर (02/10/2025)
दिनांक 02/10/2025 रोजी धमचर्क प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महामंडळाचा स्टॉल लावण्यात आला होता. सदर कार्यक्रमा दरम्यान मा.ना. श्री. संजयजी शिरसाट साहेब, मंत्री - सामाजिक न्याय विभाग यांनी महामंडळाच्या स्टॉल ला भेट दिली, त्याप्रसंगी मा.मंत्री महोदय यांचे स्वागत करताना श्री.सुशांत बेझलवार, जिल्हा व्यवस्थापक – नागपूर.

जिल्हा कार्यालय - नागपूर
जिल्हा कार्यालय - नागपूर
जिल्हा कार्यालय - नागपूर

जिल्हा कार्यालय - नागपूर (04/10/2025)
दिनांक 04/10/2025 रोजी सुरेश भट सभागृह, नागपूर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर मेळाव्यात ओबीसी महामंडळाचा स्टॉल लावण्यात आला होता.

जिल्हा कार्यालय - नागपूर
जिल्हा कार्यालय - नागपूर
जिल्हा कार्यालय - नागपूर

जिल्हा कार्यालय - पुणे (08/10/2025)
दिनांक 08/10/2025 रोजी पुणे येथे आयोजित DLCC बैठकी दरम्यान श्री. सदाशिव पाटील, जिल्हा व्यवस्थापक – पुणे यांनी उपस्थितांना महामंडळाच्या योजनांची माहिती दिली व योजनांची माहिती पत्रके वितरीत केली. तसेच, बँकाकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा आढावा घेऊन प्रलंबित प्रस्ताव निकाली काढण्याबाबत संबंधितांना विनंती केली.

जिल्हा कार्यालय - पुणे

जिल्हा कार्यालय - रायगड (07/10/2025)
श्री. प्रतिक पाटील, बाह्यसेवा कर्मचारी - जिल्हा कार्यालय रायगड यांनी दि.07.10.2025 रोजी स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान (RSETI), अलिबाग येथे उपस्थितीताना महामंडळाच्या योजनांची माहिती दिली.

जिल्हा कार्यालय - रायगड
जिल्हा कार्यालय - रायगड
जिल्हा कार्यालय - रायगड
जिल्हा कार्यालय - रायगड

जिल्हा कार्यालय - सिंधुदुर्ग (29/10/2025)
महामंडळाचे बाह्यसेवा कर्मचारी श्री प्रसाद गावडे, जिल्हा कार्यालय – सिंधुदुर्ग यांनी दि. 29/10/2025 रोजी ग्रामपंचायत रान बांबूळी, तालुका कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या शासकीय योजना प्रसिद्धी कार्यक्रमास उपस्थित राहून उपस्थितांना महामंडळ राबवित असलेल्या योजनाची माहिती दिली.

जिल्हा कार्यालय - सिंधुदुर्ग

सप्टेंबर - 2025, स्वयंरोजगार मेळावा तपशील

जिल्हा कार्यालय - अहिल्यानगर
दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजक मार्गदर्शन केंद्र अहिल्यानगर यांनी आयोजित केलेला न्यू आर्ट कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहिल्यानगर येथे महामंडळाचे बाह्य सेवा कर्मचारी सौ.सोळंके मीरा यांनी मेळाव्यास उपस्थित राहून उपस्थितांना माहिती दिली व माहितीपत्रकं वितरीत केली.

जिल्हा कार्यालय - धाराशिव
दिनांक 15/09/2025 रोजी तहसील कार्यालय कळंब येथे स्वयंरोजगार मेळावा झाला , या मेळाव्यात महामंडळाचे बाह्यसेवा कर्मचारी श्री. मधुकर शिनगारे यांनी उपस्थित राहून लाभार्थीना महामंडळ राबवित असलेल्या योजनांची माहिती दिली.

जिल्हा कार्यालय - धाराशिव
दिनांक 16/09/2025, दिनांक 18/09/2025 व दिनांक 19/09/2025 रोजी तहसील कार्यालय तुळजापूर, लोहारा आणि उमरगा येथे स्वयंरोजगार मेळावा झाला , या मेळाव्यात महामंडळाचे बाह्यसेवा कर्मचारी श्री. मधुकर शिनगारे यांनी उपस्थित राहून लाभार्थीना महामंडळ राबवित असलेल्या योजनांची माहिती दिली.

जिल्हा कार्यालय - पालघर
दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हा कौशल्य विकास, पालघर यांनी तालुका वाडा येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा स्वामी विवेकानंद आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज आयोजित केला होता. सदर मेळाव्यास जिल्हा कार्यालय पालघर बाह्य सेवा कर्मचारी श्री. हरीश वझे यांनी उपस्थित राहून महामंडळ राबवीत असलेल्या योजनांची माहिती दिली.

जिल्हा कार्यालय - सांगली
दि. 29.09.25 रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा विटा येथे बाह्य सेवा कर्मचारी श्री रोहित निकम यांनी सदर मेळाव्यास उपस्थित राहुन महामंडळाच्या योजनांची माहिती दिली व माहिती पत्रके वितरीत केली.

जिल्हा कार्यालय - सातारा
जिल्हा कार्यालय, सातारा यांचेद्वारा दि.01/09/2025 रोजी गोंदवले बु येथे आयोजित मेळाव्यात महामंडळ योजनांची माहिती देण्यात आली.

जिल्हा कार्यालय - सोलापूर
दिनांक - 15 सप्टेंबर 2025 रोजी श्री.गणेश नाईक विद्या मंदिर रत्न मंजिरी सोसायटी, विजापूर रोड जुळे, सोलापूर येथे पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळावा संपन्न झाला. सदर मेळाव्यात बाह्यसेवा कर्मचारी श्री अमित येरगुंटला यांनी उपस्थित राहून महामंडळाच्या योजनांची माहिती दिली व माहिती पत्रके वितरीत केली. सदर मेळाव्यास श्रीम.संगिता खंदारे, सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास, सोलापूर व अन्य मान्यवर उपस्थित होते

जिल्हा कार्यालय - सोलापूर
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्या. सोलापूर आणि के.पी. मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक - 25 सप्टेंबर 2025 रोजी उद्योजक मेळावा संपन्न झाला. सदर मेळाव्यास बाह्यसेवा कर्मचारी श्री अभिषेक लाड यांनी उपस्थित राहून महामंडळाच्या योजनांची माहिती दिली व माहिती पत्रके वितरीत केली. सदर मेळाव्यास श्री. राम वाकाडे, जिल्हा अग्रणी बँक, श्री.ओम प्रकाश अष्टेकर डायरेक्ट, श्रीम.चंद्रिका चव्हाण मॅडम, श्रीम.संगिता खंदारे, सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास, सोलापूर आदि मान्यवर उपस्थित होते

जिल्हा कार्यालय - ठाणे
महामंडळाच्या योजनांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी शहापूर तालुक्यातील किन्हवली या गावी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री प्रकाशजी भांगरथ सर यांच्या मार्गदर्शनाने दिनांक 30.09.2025 रोजी मेळावा संपन्न झाला. सदर मेळाव्यात श्री महेश शिंदे, वसुली निरीक्षक (बा. से.) यांनी उपस्थितांना महामंडळाच्या एक लाख थेट कर्ज योजनेची तसेच इतर सर्व योजनांची माहिती दिली. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी उपस्थितांपैकी 20 इच्छूक व्यक्तींनी थेट कर्ज योजनेचे फॉर्म विकत घेतले असून, त्याअनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.


क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194 व्या जयंतीनिमित्त मु.पो.नायगांव, ता-खंडाळा, जिल्हा – सातारा येथे दि.03.01.2025 रोजी आयोजित कार्यक्रमादरम्यान राज्याचे मा.मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. तसेच, महामंडळाच्या स्टॉलला देखील भेट दिली. सदर प्रसंगी विभागाचे मंत्री मा.ना.श्री.अतुल मोरेश्वर सावे आणि मंत्री मंडळातील अन्य मा.मंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी, शासनाचे वरिष्ठ अधिकारी तसेच, महामंडळाचे मा.व्यवस्थापकीय संचालक, श्री. आनंद माळी व अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.


क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 193 व्या जयंतीनिमित्त मु.पो.नायगांव, ता-खंडाळा, जिल्हा – सातारा येथे दि.03.01.2024 रोजी आयोजित कार्यक्रमादरम्यान राज्याचे मा.मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथ शिंदे यांनी महामंडळाच्या महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना या ऑनलाईन योजनेच्या पोर्टलचे उद्घाटन केले तसेच, महामंडळाच्या स्टॉलला देखील भेट दिली. सदर प्रसंगी विभागाचे मंत्री मा.ना.श्री.अतुल मोरेश्वर सावे आणि मंत्री मंडळातील मा.ना.श्री.छगन भुजबळ तसेच, मा.ना.श्री.शंभुराज देसाई, स्थानिक लोकप्रतिनिधी, शासनाचे वरिष्ठ अधिकारी तसेच, महामंडळाचे मा.व्यवस्थापकीय संचालक, श्री.प्रफुल्ल ठाकुर व अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्य कार्यालय

प्रशासकीय भवन, ४ था मजला,रामकृष्ण चेंबूरकर मार्ग,चेंबूर, मुंबई ४०००७१
दूरध्वनी. 2527 5374 | 2529 9685
  homsobcfdc[at]gmail[dot]com

आमची जिल्हा कार्यालये

कोकण विभाग

  • 022-35597541
  • 022-35597541
  • 022-20813625
  • 9869281787
  • 02141-224448
  • 02352-228470
  • 02362-228119

पुणे विभाग

  • 020-29523059
  • 02162-295184
  • 0233-2321513
  • 0217-2312595
  • 0231-2653512

नाशिक विभाग

  • 0253-2236073
  • 02562-278497
  • 0257-2261918
  • 0241-2450030
  • 02564-210062

छत्रपती संभाजीनगर विभाग

  • 0240-2341544
  • 02482-223420
  • 02452-227615
  • 02472-223863
  • 02442-232624
  • 02462-220865
  • 02382-253334
  • 02456-224442

अमरावती विभाग

  • 0721-2550339
  • 07262-248285
  • 07232-243052
  • 0724-2410221
  • 07252-231665

नागपूर विभाग

  • 0712-2956086
  • 07152-232881
  • 07184-299094
  • 07172-262420
  • 07182-234037
  • 07132-223024
View All
वेबसाइट भेट संख्या | Website Visits
0
Total Visits
© हे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित. | साइट मॅप | Aaple Sarkar | E-Tender | जाहिरात | संपर्क करा Honoured for india by affix center