महामंडळाची स्थापना
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची स्थापना दिनांक 25 सप्टेंबर, 1998 च्या शासन निर्णयान्वये झाली असून, दिनांक 23.04.1999 रोजी कंपनी कायदा, 1956 अन्वये महामंडळाचे कामकाज सुरु झाले आहे. राज्यातील इतर मागासवर्गीयांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच ते करीत असलेल्या व्यवसायांना सक्षम करण्यासाठी अर्थसहाय्य करण्याचे कार्य या महामंडळाकडे सोपविले आहे.
स्थापनेची उद्दिष्टे
-
राज्यातील इतर मागासवर्गीयांच्या कल्याण व विकासासाठी कृषी विकास, पणन, संस्करण, कृषी उत्पादनाचा पुरवठा आणि साठवण, लघु उद्योग, इमारत बांधणी, परिवहन या कार्यक्रमांची आणि अन्य व्यवसाय ( वैद्यकीय, अभियांत्रिकी, वास्तुशास्त्रीय यांसारखे ) व्यापार किंवा उद्योग यांची योजना आखणे, त्यांना चालना देणे, सहाय्य करणे, सल्ला देणे, मदत करणे, वित्त पुरवठा करणे, त्यांचे संरक्षण करणे.
-
इतर मागासवर्गीयांची आर्थिक स्थिती, उत्पादन निर्मिती, व्यवस्थापन आणि पणन यांचा विकास करणे / त्यात सुधारणा करणे, त्यांचे कामकाज, व्यवसाय, व्यापार किंवा उद्योग सुरु करण्यासाठी त्यांना भांडवल, पतसाधने, साधनसामुग्री आणि तांत्रिक व व्यवस्थापकीय साधने पुरविणे.
-
इतर मागासवर्गीयांसाठी कृषी उत्पादने, वस्तु, साहित्य आणि सामुग्री यांची बनावट, निर्मिती, जुळवणी व पुरवठा यासाठी विविध क्षेत्रातील व्यक्ती किंवा संघटनांबरोबर करार करणे आणि त्यांच्याकडील मागण्या हाती घेणे आणि त्या इतर मागासवर्गीय लोकांना उपकंत्राटाने देऊन किंवा त्याबाबत त्यांच्याकडे कामाच्या मागण्या सुपूर्द करून, त्यांचेकडून कामे यथायोग्य रितीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक वाटतील अशा सेवा देणे.
-
राज्यातील इतर मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी योजना सुरु करणे आणि त्यांना चालना देणे, या प्रयोजनासाठी अहवाल आणि निलप्रती ( ब्लू प्रिंटस् ) तयार करणे, तयार करुन घेणे आणि आकडेवारी व इतर माहिती गोळा करणे.
-
वरील कामे प्रभावीपणे पार पाडण्यासाठी आवश्यक वाटेल त्याप्रमाणे कंपन्या, संघ, सल्लागार मंडळे किंवा योग्य त्या संस्था प्रवर्तित करणे आणि स्थापन करणे.
महामंडळाचे अधिकृत व वितरीत भाग भांडवल
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे अधिकृत भाग भांडवल रु.250.00 कोटी इतके असून, त्यापैकी मार्च, 2025 पर्यंत शासनाकडून रु.232.99 कोटी भागभांडवली अंशदान म्हणून प्राप्त झाले आहे. सदर रक्कमेमध्ये शासन कर्जमाफीची रु.49.49 कोटी इतकी रक्कम समाविष्ट आहे.
शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाचे अधिकृत भाग भांडवल रु.100 कोटी इतके असून, त्यापैकी माहे मार्च, 2025 पर्यंत मुख्य कंपनीकडून रु.65.00 कोटी भागभांडवली अंशदान म्हणून प्राप्त झाले आहे.
संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाकरीता रू.50.00 कोटी इतके अधिकृत भाग भाडंवल मंजुर करण्यात आले आहे.
जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाकरीता रू.50.00 कोटी इतके अधिकृत भाग भाडंवल मंजुर करण्यात आले आहे.
संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळाकरीता रू.50.00 कोटी इतके अधिकृत भाग भाडंवल मंजुर करण्यात आले आहे.
संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाकरीता रू.50.00 कोटी इतके अधिकृत भाग भाडंवल मंजुर करण्यात आले आहे.
संत श्री संताजी महाराज आर्थिक विकास महामंडळाकरीता रू.50.00 कोटी इतके अधिकृत भाग भाडंवल मंजुर करण्यात आले आहे.
संत श्री. रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळाकरीता रू.50.00 कोटी इतके अधिकृत भाग भाडंवल मंजुर करण्यात आले आहे.
स्व. विष्णूपंत रामचंद्र दादरे (लोणारी) आर्थिक विकास महामंडळाकरीता रू.50.00 कोटी इतके अधिकृत भाग भाडंवल मंजुर करण्यात आले आहे.
सोळा कुलस्वामिनी आर्थिक विकास महामंडळाकरीता रू.50.00 कोटी इतके अधिकृत भाग भाडंवल मंजुर करण्यात आले आहे.
श्री संत शिरोमणी नामदेव महाराज समस्त शिंपी समाज आर्थिक विकास महामंडळाकरीता रू.50.00 कोटी इतके अधिकृत भाग भाडंवल मंजुर करण्यात आले आहे.
संत भोजलिंग काका सुतार समाज आर्थिक विकास महामंडळाकरीता रू.50.00 कोटी इतके अधिकृत भाग भाडंवल मंजुर करण्यात आले आहे.
लेवा पाटीदार समाज आर्थिक विकास महामंडळाकरीता रू.50.00 कोटी इतके अधिकृत भाग भाडंवल मंजुर करण्यात आले आहे.
सरदार वल्लभभाई पटेल गुजर समाज आर्थिक विकास महामंडळाकरीता रू.50.00 कोटी इतके अधिकृत भाग भाडंवल मंजुर करण्यात आले आहे.
आगरी समाज आर्थिक विकास महामंडळाकरीता रू.50.00 कोटी इतके अधिकृत भाग भाडंवल मंजुर करण्यात आले आहे.
संचालक मंडळाबाबत
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ |
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या संचालक मंडळात एकूण 15 सदस्य असून त्यामध्ये 7 शासकीय सदस्य व 8 अशासकीय सदस्य आहेत. |
अ.क्र. |
पदनाम |
1 |
मा. मंत्री तथा अध्यक्ष, इतर मागास बहुजन कल्याण विभाग तथा मा.अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. |
2 |
मा.राज्यमंत्री तथा उपाध्यक्ष, इतर मागास बहुजन कल्याण विभाग तथा मा.उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. |
3 |
मा.अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव,
इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई-400 032. |
4 |
मा. सहसचिव,
कल्याण मंत्रालय, भारत सरकार, शास्त्री भवन, नवी दिल्ली. |
5 |
मा. संचालक,
इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, 5 वा मजला, 3, चर्च रोड, महाराष्ट्र राज्य,पुणे-1. |
6 |
मा. सहकार आयुक्त व निबंधक, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, 3 रा मजला, सेंट्रल बिल्डींग, महाराष्ट्र राज्य, पुणे. |
7 |
प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक, 9,महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई-400001. |
8 |
मा. व्यवस्थापकीय संचालक,
राष्ट्रीय मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळ, 5 वा मजला, एन.सी.आय.बिल्डींग, 3,
सिरि इन्स्टीटयुशनल एरिया, ऑगस्ट क्रांती मार्ग, नवी दिल्ली - 110 016. |
9 |
मा. व्यवस्थापकीय संचालक,
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ,
प्रशासकीय इमारत, 4था मजला, चेंबूर (पू.), मुंबई - 400 071. |
10 |
अशासकीय सदस्य - 6 |
महामंडळाची प्रशासकीय संरचना
महामंडळाचे प्रशासकीय नियंत्रण शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडे आहे. महामंडळाच्या कार्यनियमावलीनुसार मा.अध्यक्ष व संचालक मंडळाची नियुक्ती शासनातर्फे केली जाते. तसेच महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक यांची नियुक्तीही शासनातर्फे करण्यात येते.
महामंडळाचे नोंदणीकृत मुख्यालय प्रशासकीय भवन, 4 था मजला, रामकृष्ण चेंबूरकर मार्ग, चेंबूर, मुंबई – 400 071 येथे आहे. शासन निर्णय दि.30.03.1999 अन्वये महामंडळाच्या मुख्यालयासाठी 39 पदे तसेच जिल्हा कार्यालयासाठी 105 पदे अशी मिळून एकूण 144 पदे मंजूर आहेत. सदर एकूण मंजूर पदांपैकी माहे जून , 2025 अखेर 31 पदे कार्यरत असून एकूण 113 पदे रिक्त आहेत.
दिनांक 01.04.2004 पासून सर्व जिल्ह्यांमध्ये महामंडळाची स्वतंत्र कार्यालये कार्यान्वित झालेली आहेत. महामंडळाची स्वत:ची वेबसाईट असून, सदर वेबसाईटवर महामंडळाच्या स्थापनेपासूनची सर्व माहिती तसेच महामंडळ राबवित असलेल्या सर्व योजनांची माहिती व कर्ज मागणी अर्जाचे नमुने उपलब्ध आहेत. वेबसाईटवर लाभार्थींची यादी वेळोवेळी अद्ययावत करण्यात येते. सर्व उपकंपनींकरीता स्वतंत्र वेबसाईट तयार करण्यात आली आहे.