१. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या.
शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ (कार्यक्षेत्र – कोकण विभाग)
संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ (कार्यक्षेत्र – 36 जिल्हे)
जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ (कार्यक्षेत्र – 36 जिल्हे) या महामंडळांअंतर्गत कर्ज योजनांचे अर्ज कोठे मिळतात ?
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयामध्ये महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची जिल्हा कार्यालये आहेत. आपण ज्या जिल्हयाचे रहिवासी असाल,त्या जिल्हयाच्या कार्यालयात आपणांस कर्ज मिळण्याकरीता भरावयाचे १) २०% बीज भांडवल तसेच, 2) रु. १.00 लक्ष मर्यादेपर्यंतच्या थेट कर्ज योजनांचे अर्ज योजनानिहाय विहित शुल्क अदा करुन उपलब्ध होतील. तसेच महामंडळाच्या ३) वैयक्तिक कर्ज व्याज परतावा, ४) गट कर्ज व्याज परतावा,५)शैक्षणिक कर्ज व्याज परतावा तसेच ६) महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा या ऑनलाईन योजनांकरीता www.msobcfdc.org या संकेतस्थळावरील ऑनलाईन योजनांच्या पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करता येईल. अर्ज मागणी करतांना सोबत जातीचा दाखला ठेवावा. अर्जदार / लाभार्थीला मार्गदर्शन व सविस्तर माहिती देण्याकरीता महामंडळाचे प्रतिनिधी (जिल्हा व्यवस्थापक) प्रत्येक जिल्हा कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत. जिल्हा कार्यालयांच्या पत्त्यांची तसेच दूरध्वनी क्रमांकाची यादी संकेतस्थळावर उपलब्ध आहे.