2527 5374 | 2529 9685
  homsobcfdc@gmail.com
   
   

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित

MAHARASHTRA   STATE   OBC   FINANCE   &   DEVELOPMENT   CORPORATION   LTD


उपकंपनी - शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ

इतर मागास बहुजन कल्याण विभाग
( महाराष्ट्र शासनाचा उपक्रम )


सा. वि. प्र. - सामान्यतः विचारले जाणारे प्रश्न ( FAQ )

१. कर्ज मिळविण्यासाठी अर्ज कोठे मिळतात ?

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयामध्ये महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची जिल्हा कार्यालये आहेत. आपण ज्या जिल्हयाचे रहिवासी असाल,त्या जिल्हयाच्या कार्यालयात आपणांस कर्ज मिळण्याकरीता भरावयाचे १) २०% बीज भांडवल तसेच 2) रु. १.00 लक्ष मर्यादेपर्यंतच्या थेट कर्ज योजनांचे अर्ज योजनानिहाय विहित शुल्क अदा करुन उपलब्ध होतील. तसेच महामंडळाच्या ३) वैयक्तिक कर्ज व्याज परतावा व ४) गट कर्ज व्याज परतावा, या ऑनलाईन योजनांकरीता www.msobcfdc.org या संकेतस्थळावरील ऑनलाईन योजनांच्या पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करता येईल. अर्ज मागणी करतांना सोबत जातीचा दाखला ठेवावा. अर्जदार / लाभार्थीला मार्गदर्शन व सविस्तर माहिती देण्याकरीता महामंडळाचा प्रतिनिधी (जिल्हा व्यवस्थापक) प्रत्येक जिल्हा कार्यालयामध्ये उपलब्ध आहे. जिल्हा कार्यालयांच्या पत्त्यांची तसचे दूरध्वनी क्रमांकाची यादी संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

२. जातीचा व उत्पन्नाचा दाखला कसा व कुठे मिळतो ?

उत्पन्नाचा दाखला प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या तहसिल कार्यालयात व जातीचा दाखला उपविभागीय अधिकारी कार्यालयात मिळतो. आपण खेडयामध्ये / गावामध्ये ज्या भागात रहात असाल त्या भागातील तलाठी, ग्रामसेवक यांचेकडून आपल्या उत्पन्नाबाबत / जातीबाबत प्रमाणपत्र घेऊन प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या तहसील / उपविभागीय / सेतू कार्यालयांत सदर प्रमाणपत्रे शपथपत्रांसह द्यावी लागतील. या शपथपत्रांच्या आधारे सदर कार्यालये आपणांस जातीचा व उत्पन्नाचा दाखला निर्गमित करतील.

३. कर्ज मंजूरी प्रक्रिया कशी असते ?

आपल्या संबंधीत जिल्हा कार्यालयात उपलब्ध असलेले कर्ज मागणीचे अर्ज सविस्तर माहितीनिशी भरुन त्यासोबत आवश्यक ते दस्ताऐवज, कागदपत्रे जोडून जिल्हा कार्यालयात कर्ज प्रस्ताव दाखल करावेत. जिल्हा कार्यालयात दाखल केलेले कर्ज मागणीचे प्रस्ताव त्या त्या जिल्हा व्यवस्थापकांकडून तपासले जातात. दाखल केलेले प्रस्ताव दस्तऐवजांसोबत परिपूर्ण असल्याची खात्री झाल्यानंतर जिल्हा लाभार्थी निवड समितीच्या मान्यतेने सदर प्रस्तावांची शिफारस मुख्यालयाकडे / बँकेकडे केल्यानंतर, निधीच्या उपलब्धतेच्या अधीन राहून कर्ज मंजूरी होते. कर्ज मंजूरीनंतर वैधानिक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर लाभार्थीना धनादेश/ NEFT/RTGS द्वारे कर्ज वाटप केले जाते.

४. कोणत्या जातींना कर्ज मिळेल?

महामंडळाच्या संकेतस्थळावर इतर मागास प्रवर्गातील जातींची यादी स्वतंत्रपणे दिलेली आहे. सदर यादीमध्ये समाविष्ट असणाऱ्या जातींच्या पात्र व्यक्तींना महामंडळाकडून कर्ज मिळते.

५. एका योजनेचा लाभ घेतला असल्यास, लाभार्थीस परत त्याच अथवा दुसऱ्या योजनेंतर्गत लाभ घेता येईल का ?

महामंडळ राबवित असलेल्या शासनाच्या एका योजने अंतर्गत कर्ज घेतलेलं असल्यास त्याच किंवा दुसऱ्या योजनेखालीही कर्ज मिळणार नाही.

६. कुटूंबातील किती व्यक्तींना एका वेळेस कर्ज मिळू शकेल ?

एकावेळी कुटूंबातील एकाच पात्र व्यक्तीला महामंडळाच्या योजनेचा लाभ घेता येईल.

७. महामंडळ राबवित असलेल्या योजनांना वित्त पुरवठा कशाप्रकारे होतो ?

अ) महामंडळास राज्य शासनाकडून भाग भांडवली अंशदान निधी उपलब्ध करुन दिला जातो. सदर निधीमधून १) २०% बीज भांडवल योजना,
2) रु.१.०० लक्षपर्यंतची थेट कर्ज योजना तसेच ब )सहाय्यक अनुदान निधीतून 3) रु.१०.०० लक्ष पर्यंतची वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना आणि
४) रु.१०.०० लक्ष ते रु.५०.०० लक्षपर्यंतची गट कर्ज व्याज परतावा योजना, या योजना राबविल्या जातात.

८. यादीत समाविष्ट असणाऱ्या प्रकल्प / उद्योगधंद्याव्यतिरिक्त इतर प्रकल्पांना / उद्योग धंद्यांना कर्ज मिळेल काय ?

संकेतस्थळावर दर्शविलेल्या यादीतील व इतर सर्व वैध प्रकल्पांना / उद्योगधंद्यांना / व्यवसायांना कर्ज देण्यात येईल.

९. कर्ज परतफेडीची पध्दत कशी असते ?

कर्जाची परतफेड संबंधीत योजनेनुसार विहित केलेल्या मुदतीत करता येईल. शक्यतो परतफेड रोख, RTGS / NEFT किंवा धनादेशाद्वारे करावी लागते. त्याचप्रमाणे महामंडळाचे अधिकारी लाभार्थीस प्रत्यक्ष भेट देवूनही वसूली करतात.
कर्ज वितरणानंतर लाभार्थीने व्यवसाय यशस्वीरित्या करुन कर्ज रक्कमेची परतफेड करणे आवश्यक आहे. सदर कर्जफेडीच्या रक्कमेतून समाजातील इतर गरजू व्यक्तींना देखील स्वयंरोजगाराची संधी प्राप्त होवू शकते याची जाणिव लाभार्थींनी ठेवावी. लाभार्थींनी कर्ज रक्कमेची परतफेड न केल्यास महामंडळाकडून कायदेशीर कार्यवाहीचा अवलंब करण्यात येतो.

टिप:

कर्ज योजना राबविण्याकरीता महामंडळाने कोणत्याही स्वरुपाचे मध्यस्थ नेमलेले नाहीत. कर्ज मिळविण्यासाठी अडचणी आल्यास महाराष्ट्र्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या चेंबूर, मुंबई येथील मुख्य कार्यालयाशी संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावर उपलब्ध असलेल्या दूरध्वनी क्रमांकावर तसेच ई - मेल अथवा पत्राद्वारे संपर्क करावा.

मुख्य कार्यालय

प्रशासकीय भवन, ४ था मजला,रामकृष्ण चेंबूरकर मार्ग,चेंबूर, मुंबई ४०००७१
दूरध्वनी. 2527 5374 | 2529 9685
  homsobcfdc@gmail.com

आमची जिल्हा कार्यालये

कोकण विभाग

 • 022-26591335
 • 022-26591335
 • 8879945080
 • 8879945080
 • 02141-224448
 • 02352-228470
 • 02362-228119

पुणे विभाग

 • 020-29523059
 • 02162-295184
 • 0233-2321513
 • 0217-2312595
 • 0231-2653512

नाशिक विभाग

 • 0253-2236073
 • 02562-278497
 • 0257-2261918
 • 0241-2450030
 • 02564-210062

औरंगाबाद विभाग

 • 0240-2341544
 • 02482-223420
 • 02452-227615
 • 02472-223863
 • 02442-232624
 • 02462-220865
 • 02382-253334
 • 02456-224442

अमरावती विभाग

 • 0721-2550339
 • 07262-248285
 • 07232-243052
 • 0724-2410221
 • 07252-231665

नागपूर विभाग

 • 0712-2956086
 • 07152-232881
 • 9423677744
 • 07172-262420
 • 07182-234037
 • 07132-223024
View All
© हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित. | साइट मॅप | वापरसुलभता |संपर्क करा Honoured for india by affix center